समाज प्रबोधनाबरोबर राष्ट्र उभारणीत शिक्षण आणि शिक्षक महत्त्वपूर्ण : आ. सुभाषबापू देशमुख - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५

समाज प्रबोधनाबरोबर राष्ट्र उभारणीत शिक्षण आणि शिक्षक महत्त्वपूर्ण : आ. सुभाषबापू देशमुख

 प्रतिनिधी :

दि. 20, शनिवार रोजी संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा या पतसंस्थेचे 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा ही श्री संत दामाजी पतसंस्था मर्यादित, मंगळवेढा आणि मंगळवेढा  तालुका शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 'महात्मा फुले गुणवंत शिक्षक', 'आदर्श शाळा', गुणवंत विद्यार्थी तसेच 'जीवनगौरव पुरस्कार' वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री तथा विधानसभा सदस्य दक्षिण सोलापूर मा.आ. सुभाषबापू देशमुख होते तर माजी आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ मा. दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण व गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला.

 तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मा.स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी  जि प सोलापूर, मा. दर्शन मेहता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मंगळवेढा, यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

तसेच या शिक्षक, विद्यार्थी व शाळा गुणगौरव सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाषबापू देशमुख बोलताना म्हणाले, की शिक्षक हा समाजाचा कणा असून कोणत्याही यशस्वी उद्योगपती,नेता, अभिनेता आणि नागरिक यांच्या यशाच्या, संस्काराच्या मागे शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो, त्यामुळेच शिक्षकांनी आधुनिक युगात  लोक वर्गणीतून शाळा डिजिटल करून शाळांना व विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे असे प्रतिपादन केले.

 माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतातून, मी एक शिक्षक या नात्याने शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणार असून शिक्षकांनी चिंतामुक्त राहून अध्यापनाचे काम करावे, असे सांगितले.शिक्षकांच्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडम म्हणाल्या की, ग्रामीण भागातील शिक्षक अनेक अडचणींवर मात करून अध्यापनाचे काम अतिशय उत्कृष्ट करीत आहेत, तसेच प्रत्येक शिक्षकांनी तन-मन-धन अर्पण करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता साहेब यांनीही मंगळवेढा म्हणजे गुणवत्तेची खान असल्याचे गौरव उद्गार काढले व सर्वच शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    शिक्षकांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून शिक्षकांना चिंतामुक्त करू असा विश्वास शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध पवार यांनी दिला.

 मंगळवेढा जसे ज्वारीचे कोठार आहे तसे गुणवत्तेची ही खाण असून मी स्वतः व सर्वच शिक्षक संघ विद्यार्थी गुणवत्तेशी बांधील असून इतर वेळेस संघटनात्मक जबाबदारी पार पडतो,असे भावनिक मत राज्य शिक्षक नेते व जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक मा. संजय चेळेकर यांनी मांडले.

 

या कार्यक्रमाची प्रस्तावना मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे यांनी केले तर सौ स्वाती महादेव पाटील व शिवाजी सोमा नकाते यांनी आदर्श शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले, तसेच दामाजी शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भीमाशंकर तोडकरी यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत व प्रगतीबाबत माहिती दिली. सचिव मोहन लेंडवे यांनी सभेमध्ये अहवालाचे वाचन करून पुढील संस्थेची ध्येयधोरणे सर्वांसमोर मांडली. याला सर्वच सभासद बंधू-भगिनींनी टाळ्याच्या गजरात प्रतिसाद दिला.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न.पा शिक्षिका तथा स्तंबलेखिका सौ. भारती धनवे-नागणे मॅडम यांनी अतिशय सूत्रबद्ध केले तर आभार प्रदर्शन निवास माळी यांनी केले.

  

   श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, जीवनगौरव पुरस्कार,गुणवंत शिक्षक, उत्कृष्ट शाळा, उपक्रमशील शिक्षक या सर्वांचा गुणगौरव समारंभ शनिवार रोजी वरील मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. असून या सन्मान सोहळ्यास मंगळवेढा व जिल्हाभरातून बहुसंख्येने  शिक्षक-बंधू भगिनींनी उपस्थित होते.

  विशेष म्हणजे कार्यक्रम स्थळी लकी ड्रॉचे  विजेत्यांना भरघोस बक्षीसही देण्यात आली.






test banner