मंगळवेढा:-
वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावर पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2019 रोजी लावण्यात आलेल्या झाडांचा सहावा वाढदिवस मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
सध्याच्या काळात रस्त्यावरील पानटपरीवर एखाद्याचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे ही आदर्शवत संकल्पना रुजवित वारी परिवाराचा ५ जून पर्यावरण दिन साजरा होत असतो.
सुरवातीस आगार प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करून सेंद्रीय खतापासून तयार केलेला केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भोसले म्हणाले आपण जसे लहान मुलांचे वाढदिवस साजरा करतो तसे वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे.वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढयातुन वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रत्येक झाड मानवाला ऑक्सिजन देते आज झाडे नष्ट झाली तर पुढे मानवाला ऑक्सिजन मिळणार नाही परिणामी मानव जगू शकणार नाही त्यामुळे आपला वाढदिवस होऊ शकणार नाही आणि म्हणूनच स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आदर्शवत आहे.
याप्रसंगी झाडे लावा,झाडे जगवा पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला प्रत्येक झाडांना लावलेले रंगीबेरंगी फुगे,रांगोळी,फुलांची सजावट विशेष लक्ष वेधून घेत होते यावेळी पेरू आणि कडुलिंबाचे रोप भेट देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नागेश डोंगरे,विष्णू भोसले,दत्ता भुसे,भरत राजपुरोहित व विशाल खटकळे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी अजित जगताप,शरद हेंबाडे,विठ्ठल गायकवाड,राजेंद्र नलवडे,रामचंद्र दत्तू,दत्तात्रय भोसले,विजय सातपुते,रतिलाल दत्तू,नागनाथ गायकवाड,विठ्ठल बिले,विजय हजारे,सुहास पवार शकील मुजावर फारुख मुजावर प्रफुल्ल सोमदळे,हुकूम मुलानी,सचिन इंगळे,प्रा विक्रम पवार,चंद्रकांत चेळेकर,भारत नागणे स्वप्नील फुगारे,सुदर्शन ढगे,रवी जाधव,अवी जाधव,विनायक सोमदळे,दिलीप अडसुळ,नाना भगरे,यश दत्तू,सतिश दत्तू यांचेसह वारी परिवाराचे सर्व सदस्य,चालक- मालक मोटर संघटनेचे सदस्य,निसर्ग प्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.