पंढरपूर :-
सरकोली (ता . पंढरपूर ) येथे उद्या रविवारी (ता . ८ ) रोजी ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा.लि.पुणे या कंपनीकडून केळी व ऊस पिक चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यावेळी सरकोली व परिसरातील शेतीमध्ये भरीव कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना "ॲग्रीकॉस पुरस्कार २०२५" देऊन गौरवण्यात येणार आहे.
यावेळी ॲग्रीकॉस पॅटर्ननुसार लागण केलेल्या केळी आणि खोडवा केळी व ऊसाच्या प्लॉट मधून शिवार फेरी काढली जाणार आहे.यामध्ये ॲग्रीकॉसचे टेक्नीकल डायरेक्टर अजय आदाटे केळी व ऊस पिकाचा ॲग्रीकॉस पॅटर्न बद्दल माहिती देणार आहेत . त्यामुळे केळी व ऊस पिकाचे नवीन निर्यातक्षम तंत्रज्ञान,योग्य लागन पद्धती, खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण,पाणी व्यवस्थापन आणि वायरस नियंत्रण याचे मार्गदर्शन या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.
तसेच नवीन ऊस लागवड तंत्रज्ञान, उसाच्या खोडव्याचे व्यवस्थापन,कीड आणि रोग नियंत्रण,उत्पादन वाढ आणि ऊसाच्या पाचटाचे व्यवस्थापन यासंदर्भातही मार्गदर्शन या चर्चासत्रात केले जाणार आहे.
या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन ॲग्रीकॉस कडून आणि कट्टे कृषी उद्योग समूहाचे शुभम कट्टे यांनी केले आहे.