मंगळवेढा:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असताना मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबने मात्र मंगळवेढा ते माचणूर सायकल राईड काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी माचणूर येथे बांधलेल्या नदीच्या घाटावर जाऊन वंदन करून जयंती साजरी केली.
सुरवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाच्या उत्सव मूर्तीचे पूजन करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दामाजी मेटकरी,राजाभाऊ माने,नितीन मेटकरी,लखन साबळे यांनी सर्व सायकल स्वारांचे स्वागत केले.
माचणूर येथे नदी घाटावर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच दिलीप कलुबर्मे व सिद्धेश्वर कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोकरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील विविध उदाहरणे सांगत जीवनपट मांडला भरकटत चाललेल्या तरुणानां योग्य दिशा दाखविण्याचे वारी परिवाराचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले खरं तर स्वतः अहिल्यादेवी होळकर यांनी माचणूर येथील नदीच्या काठावर ऐतिहासिक दगडी घाट बांधला अशा ठिकाणी सायकल वरती जाऊन वंदन करून वारी परिवाराने खऱ्या अर्थाने जयंती साजरी करून ऐतिहासिक विचारांचा वारसा जपला आहे.
सदर राईडमध्ये नागेश डोंगरे,सतिश भाऊ दत्तू,विजय क्षीरसागर,चंद्रजीत शहा,संदेश माळी,पृथ्वीराज कलुबर्मे,वरद माळी,शिवतेज कलुबर्मे,निखिल दत्तू,प्रफुल्ल सोमदळे,स्वप्निल टेकाळे,पांडुरंग कोंडूभैरी,संजीव दत्तू,सिद्धेश्वर डोंगरे,भारत नागणे,विष्णू भोसले,पांडुरंग नागणे,कृष्णा दत्तू,प्रा.महेश अलिगावे,रतिलाल दत्तू,यश महामुनी,प्रमोद महामुनी,सतिश दत्तू,नंदकुमार नागणे,संजय जावळे,सुमित भोसले,गणेश मोरे,सुजित मुदगुल,रतिलाल आसबे,कमलेश माळी,समीर गुंगे,संतोष दत्तू,प्रकाश मुळीक,राजाभाऊ गणेशकर,संजय जावळे,पवन टेकाळे,प्रथमेश पवार,फारुख मुजावर,निलेश गायकवाड आदिजण सहभागी होते.
प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.