अनिल सावंत यांच्या वाढदिवस निमित्त कुस्ती स्पर्धा संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २० मे, २०२५

अनिल सावंत यांच्या वाढदिवस निमित्त कुस्ती स्पर्धा संपन्न.


मंगळवेढा:-

भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल सावंत मित्र मंडळ पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने एका रोमांचक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये महाराष्ट्रातील अव्वल कुस्तीगीर सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चाहते आणि नवोदित कुस्तीगीरांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.


या स्पर्धेमध्ये एक लाख रुपये, पन्नास हजार, पस्तीस हजार, पंचवीस हजार, पंधरा हजार व दहा हजार रुपये अशी बक्षिसे तर महिलांसाठी ५० हजार, ४० हजार, ३० हजार, वीस हजार, १० हजार,५ हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली होती. 


वाढदिवसानिमित्त सोमवार दि.१९ मे रोजी दुपारी ४ वाजता सलगर बु.येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न झाल्या. या कुस्त्यांच्या मैदानात पै.धनाजी कोळी पुणे व पै.राघू ठोंबरे कोल्हापूर यांची एक लाखांची कुस्ती बरोबरीत सुटली तर महिला गटात पै.सई फडतरे मंगळवेढा व पै.रोहिणी माळी परांडा यांच्या मध्ये पै.सई फडतरे हिने बाजी मारली.


पुरुष गटात पै.शुभम माने पुणे व पै.किरण मिसाळ अकलूज यांची ७५ हजारांची कुस्ती झाली, शुभम माने विजयी, पै. परमेश्वर गाडे बामणी व पै.बाळकृष्ण शेळके, कोल्हापूर यांची ५० हजारांची बरोबरीत सुटली, पै.सौरभ घोडके मंगळवेढा व पै.श्रीकांत खरात वाखरी यांची ३५ हजारांची सौरभ घोडके विजयी, पै. समर्थ चौरे पेनूर व पै. कृष्णदेव बनसोडे जामगाव यांची २५ हजारांची कृष्णदेव बनसोडे विजयी, पै. चैतन्य बोराडे तळसंगी व पै.समाधान ओमने मंगळवेढा यांची १५ हजारांची, बोराडे विजयी तर पै. सुर्या अभंगराव, वाखरी व पै. ओंकार हजारे, खर्डी यांची १० हजारांची कुस्ती ओंकार हजारे विजयी झाले. तसेच महिला गटात पै.श्रुती गेजगे मंगळवेढा व पै. श्रावणी हजारे मंगळवेढा यांची ४० हजारांची, पै. श्रुती गेजगे विजयी, पै. श्रेया गेजगे मंगळवेढा व पै. सोनम जाधव पंढरपूर यांची ३० हजारांची बरोबरीत सुटली, पै. अनन्या हिंगमिरे मंगळवेढा व पै. मंजिरी जाधव पंढरपूर यांची २० हजारांची बरोबरीत सुटली, या कुस्त्यांचे संयोजक अनिलदादा मित्र परिवारातील इंद्रजित पवार, चंद्रकांत देवकर, अशोक निकम, तानाजी चव्हाण यांनी केले.


या कुस्ती स्पर्धेला सलगरचे सरपंच सुदाम कदम, दामाजी शुगर चे संचालक बसवराज पाटील, शिरनांदगी, मारुती वाकडे, सरपंच गुलाब थोरबोले, आप्पा माने सरकार, शशिकांत निकम, कृष्णदेवराय लोंढे, रमेश पवार, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, संतोष रंधवे, डॉ कृष्णात माने, माजी सरपंच महादेव देवकर, भारत निकम, लाला शेख, सुजित जाधव, अरुण गायकवाड, मेजर निंबाळकर, आबा पवार, महेश पाटील पत्रकार, महेश टिक्के, बंडू पुजारी निगडी, सरपंच, शिंवाजी चव्हाण, धऱ्याप्पा हडलसंग, समीर जाधव, पिनू जाधव, मदन घाटगे, कृष्णा निकम, नागा भुसे, नामदेव पवार, पंढरी इंगोले, मानसिंग पवार सर यांनी उपस्थित राहून कुस्तीगीरांचे मनोबल उंचावले. 


या स्पर्धेने कुस्तीगीरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेच नाही तर शारीरिक तंदुरुस्ती आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळांचे महत्त्व देखील अधोरेखित केले.


स्पर्धेचे निवेदन अशोक धोत्रे यांनी केले तर आभार अजय आदाटे यांनी मानले.


test banner