सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उद्या वार्षिक बैठकीचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने उद्या वार्षिक बैठकीचे आयोजन.


मंगळवेढा:-

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा मंडळाची वार्षिक बैठक गुरुवारी १ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता नगरपालिका शाळेसमोरील गणेश बागेमध्ये आयोजित केल्याचे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी सांगितले. 


सदरील या बैठकीमध्ये ४९ व्या शिवजयंतीच्या सोहळ्याचा जमा खर्चाचा तपशील मांडण्यात येणार आहे.


तसेच ५० वा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याच्या संदर्भातील नियोजन तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात येणार आहे.


तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व शिवभक्तांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



test banner