प्रतिनिधी \ मंगळवेढा:-
शेतकऱ्यांचे पिक-पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऊसाचे आणि इतर पिकांचे उत्पादन घटत चालले आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता सर्व पिकांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी फोर्स व जिओजीबच्या बरोबरीने झेनीयाचा वापर वाढवायला हवा,असे मत ॲग्रीकॉस एक्स्पोर्टस् प्रा.लि.चे कार्यकारी संचालक अजय आदाटे यांनी पंढरपूर येथे व्यक्त केले.
कमी खर्चात उत्पन्न जास्त कसे वाढेल यासाठी पीक लागणीपासून कापणीपर्यंतचे तंत्र समजून घेतले पाहिजे. शेताची पंचसूत्री लक्षात घेतली पाहिजे. यामध्ये पाण्याचे नियोजन,खताचे आयोजन,माती व पाणी परीक्षण,जमिनीच्या प्रतिनुसार सरीतील अंतर, खत व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन अशा प्रकारची योग्य ती काळजी घेतली तर उत्पन्नात वाढ होऊन खर्च कमी होण्यास मदत होईल,असे प्रतिपादन कृषीमित्र अजय आदाटे यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, गोपाळपूर येथे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा पाणी व्यवस्थापनाबद्दलचा कार्यक्रम घेण्यात आला,यानिमित्ताने सोनाली पाटील,अभिजीत केणे,राहुल नंदी,उद्धव बागल यांनी आपले अनुभव सांगितले,निश्चितच या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी भविष्यातील शेतीचे नियोजन केल्यास त्यांना फायदा होईल असे मत कार्यक्रमाचे आयोजक कार्यकारी अभियंतासो क.हरसुरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता,यावेळी प्रमुख वक्ते अदाटे यांनी अमेरिका स्थित निक या शरीराने अपंग परंतु ना उमेद न होता जिद्दीने अनेक विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे चलचित्र दाखवून शेतकऱ्यांमध्ये चैतन्य भरण्याचा प्रयत्न केला.
आज शेतकरी शेतात करत असलेले कष्ट व त्याचा योग्य तो मोबदला मिळतो का ? याचा विचार करता हातात काहीही राहत नाही, असे दिसते. याचे कारण त्यासाठी उत्पन्न वाढीसाठी लागणारे ज्ञान याबाबत शेतकरी जागृत नसतो. पिक लागवडी बाबतचे तंत्रज्ञान समजून घेणे महत्वाचे ठरते. शेतीमधील पिके ही शेतकऱ्यांचा आर्थिक कणा समजला जातो. त्यासाठी कोणते पिकाचे उत्पन्न घेत असताना त्याबाबतची योग्य ती खबरदारी व त्यासाठी योग्य ते तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.
यावेळी स्वेरी समूहाचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक काळाला कमी पाण्यातील तंत्रज्ञानाची व अभ्यासू वृत्तीची जोड दिली पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो काळानुरूप आपल्यात बदल केले पाहिजे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात जास्त व उत्तम दर्जाचे उत्पन्न काढले तर उद्याचा काळ आपलाच असेल हे मात्र नक्की. त्यासाठी कृषी मित्र अजय आदाटे यांच्यासारख्या तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. असे मत व्यक्त केले.
नवीन ॲग्रीकॉस पीक पॅटर्न, ऐआय टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, रेसिड्युल फ्री क्रॉपिंग,पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कृषी व्यवस्थापन,स्पिंकलर,ड्रिप इरिगेशन यासारख्या सिंचन व्यवस्थापन पद्धती, याबरोबरच चर्चासत्रात पाणी आडवा पाणी जिरवा यापुढे जाऊन आता पाणी साठवा आणि पाणी वापरा असा मंत्र देऊन चर्चासत्राची सांगता करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती इंगोले सहाय्यक अभियंता,पंढरपूर व सोमनाथ देशमुख यांनी केले,आभार अतुल धोत्रे उपविभागीय अभियंता, सांगोला यांनी मानले.