मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे दिनांक 9 मे रोजी भरण्यात येणारी लक्ष्मीदेवीची यात्रा स्वच्छ,निर्मल व सुंदर होण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा ते लक्ष्मी दहिवडी निर्मल यात्रा प्रबोधन सायकल राईड काढण्यात आली.
सुरवातीस सर्व सायकल स्वारांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी येणाऱ्या यात्रेमध्ये लक्ष्मी दहिवडी गावात लोकसहभागातून ग्रामस्थांनी आपले गाव हरित होण्यासाठी झाडे लावून झाडे जपण्याचा संकल्प करावा असे आवाहन वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले.
तसेच पाणी जपून वापरा,उन्हामध्ये जेष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नका,आपल्या गावातील वाढते तापमान कमी करायचे असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही,मुली वाचवा देश वाचवा,सायकल चालवा इंधन वाचवा असा प्रबोधनाचा जागर घालण्यात आला.
दहिवडी यात्रेसाठी लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक एकत्र येत असतात उन्हाची तीव्रता असताना देखील भाविक या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतात.
यामुळे अनेकजण आपले प्रातःविधी रस्त्याच्या कडेला वगैरे आटपून घेतात परिणामी याचा यात्रेवर व यात्रा झाल्यानंतर त्या गावावर विपरीत परिणाम होतो त्या गावातली अस्वच्छता,रोगराई वाढत असते यासाठी भक्तांनी शौचालयांचाच वापर करावा,प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा,गावाचा परिसर स्वच्छ ठेवावा,नारळाची केसर व इतर निर्माल्य रस्त्यावर टाकू नये असे केले तरच आपोआप परिसर स्वच्छ होतो तिथलं पावित्र्य जपलं जाईल आणि हीच खरी निर्मल लक्ष्मी दहिवडी यात्रेची श्रीमंती आहे असे ग्रामस्थांना आवाहन करीत सार्वजनिक वाचनालय येथे समारोप करण्यात आला.
यावेळी सरपंच अनिल पाटील,दिलीप पाटील,निसार तांबोळी,कैलास मसरे,संजय कांबळे,एम एल जुधंळे,प्रदीप पाटील,गणेश बनसोडे,पांडुरंग सूडके यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सदर राईडमध्ये जयंत पवार,चंद्रजीत शहा,विजय क्षीरसागर संदेश माळी,प्रफुल्ल सोमदळे,पांडुरंग कोंडूभैरी,सिद्धेश्वर डोंगरे,भारत नागणे विष्णू भोसले,स्वप्निल टेकाळे,ओम लुगडे,पांडुरंग नागणे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी सायकस्वार सहभागी होते.