कृषीमित्र अजय आदाटे यांना जनकल्याण महापुरस्कार पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

कृषीमित्र अजय आदाटे यांना जनकल्याण महापुरस्कार पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.


प्रतिनिधी/ मंगळवेढा:-


जनकल्याण युवा विचारमंच पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्ती जयंती सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील कृषीमित्र अजय आदाटे यांना कल्याण महापुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


अजय आदाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहेत.शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीविषयक मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ते प्रयत्नशील असतात. 

त्यांच्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीमधून नफा मिळवणे शक्य झाले आहे. 


ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे या शेतीविषयक काम करणाऱ्या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, अजय आदाटे  यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी पुणे येथे विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे, डॉ.दत्ताजी कोहिनकर,दलित किंग कोब्रा अध्यक्ष भाई चव्हाण यांच्या शुभहस्ते अजय आदाटे यांना प्रमाणपत्र, संविधान प्रत आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


अजय आदाटे हे कृषी सेवे सोबत इतर अनेक सामाजिक कामात आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवत असतात. वृक्ष लागवडी सोबत वारी परिवारामध्येही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. 

त्यामुळे यांना सन्मानित करत असताना आपली चळवळ संस्थेला विशेष आनंद होत असल्याची भावना जनकल्याण युवा विचारमंचचे पितांबर धिवार यांनी बोलताना व्यक्त केली. 


अजय आदाटे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.


test banner