आज अभिजित जाधव व आमु जाधव करणार शिवशंभुची गर्जना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

आज अभिजित जाधव व आमु जाधव करणार शिवशंभुची गर्जना.


मंगळवेढा:-

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सहाव्या पुष्पातून आज सायं 7.30 वाजता आपल्या कलेतून महाराष्ट्रातील तरुणांना अक्षरशः वेड लावणारे अभिजित जाधव व आमू जाधव आंबे जोगाई जि.बीड शिवशंभुची गर्जना करणार आहेत.


इतिहासाच्या पानांत सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलेल्या वीर रणधुरंधर योध्यांचा जागर रनवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला महाराष्ट्रात गाजलेला जबरदस्त कार्यक्रम होणार आहे.


तसेच संबळ वादन व दिमडीची जुगलबंदी,देवीचा जागर,शिवगिते,आपल्या पहाडी आवाजातून सादर करणार आहेत.


कार्यक्रमाचे उदघाटन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या हस्ते व ठाण्याचे नगरभुमापन अधिकारी सिद्धेश्वर घुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रदिप खांडेकर,लक्ष्मण जगताप,चेतन गाडवे,नवनाथ पवार,सुभाष बागल,चंद्रकांत पडवळे,तानाजी काकडे,पांडुरंग नाईकवाडी,भैया सावंत,दत्तात्रय बागल,सरोज काझी,पप्पू यादव,शिवाजी जाधव,सिद्धेश्वर दत्तू,जनार्धन डोरले,युवराज शिंदे,आझाद दारुवाले,दिपक घुले,संतोष कोंडूभैरी,मच्छिन्द्र नागणे आदी उपस्थित रहणार आहेत.


तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.


test banner