मंगळवेढा:-
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 356 शिवभक्तांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ.सुरेश होनमाने यांच्या हस्ते व डॉ.दत्तात्रय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी,डॉ. नितीन आसबे,डॉ.रविंद्र नाईकवाडी,डॉ.संदेश पडवळ,डॉ.अस्लम मुलाणी,डॉ.विवेक निकम,डॉ.अभिजित हजारे,डॉ.सुनील जाधव,डॉ. गिरीश मासाळ,डॉ.कैलास नरळे,डॉ.नितीन चौडे,डॉ.देवदत्त पवार,डॉ. विपुल कट्टे आदी डॉक्टर,मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत रक्ताचा तुटवाडा भासत असताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या विचाराने रेवनील ब्लड बँक व अक्षय ब्लड बँक यांच्या सौजन्यातून तरुणांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले.
यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र तर महिला रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.