मंगळवेढा:-
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर संपन्न होणार असून सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ.सुरेश होनमाने यांच्या हस्ते व डॉ.दत्तात्रय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी डॉ.सतिश गोखले,डॉ.शरद शिर्के,डॉ.लक्ष्मीकांत मर्दा,डॉ. सतिश डोके,डॉ.नितीन आसबे,डॉ.निनाद नागणे,डॉ.दत्तू,डॉ.नंदकुमार शिंदे,डॉ.रविंद्र नाईकवाडी,डॉ.अतुल भालके,डॉ.संदेश पडवळ,डॉ. अस्लम मुलाणी,डॉ.धवल औताडे,डॉ.उदयसिहं दत्तू,डॉ.सुरेश काटकर,डॉ.विवेक निकम,डॉ.अभिजित हजारे,डॉ.प्रशांत नकाते,डॉ. शाकीर सय्यद,डॉ.समाधान टकले,डॉ प्रविण सारडा,डॉ.अशोक सुरवसे,डॉ.सुनील जाधव,डॉ.संदेश ताठे,डॉ.युवराज पवार,डॉ.स्वप्निल कोकरे,डॉ.गिरीश मासाळ,डॉ.कैलास नरळे,डॉ.संतोष मेटकरी,डॉ. नितीन चौडे,डॉ.देवदत्त पवार,डॉ.दशरथ फरकंडे,डॉ.राहुल शेजाळ,डॉ.अजित जावळे,डॉ.विपुल कट्टे आदी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
महाराष्ट्रात सद्यस्थितीत रक्ताचा तुटवाडा भासत असताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या विचाराने जास्तीत जास्त नागरिकांनी व तरुणांनी रक्तदान करावे तसेच विदयार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलगुणांना वाव देण्यासाठी वेशभूषा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरासाठी व स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांनी केले आहे.