प्रतिनिधी :
बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवर हिंदू मंदिरांवर तसेच भारताच्या ध्वजाचा झालेला अपमान याच्या निषेधार्थ दामाजी चौक येथे मंगळवेढ्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशाचा ध्वज जाळून, ध्वजाला चपला मारून व बांगलादेश विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला
यावेळी बोलताना हिंदुत्व कार्यकर्ते सुदर्शन यादव म्हणाले "बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवर अन्याय अत्याचार ही सहनशीलता संयम सुटू नये, तसेच भारतातील हिंदू समाज हा बांगलादेशातील हिंदू समाजाच्या पाठीशी आहे आणि भविष्य काळामध्ये जर हा हिंदूंवर होणारा अत्याचार थांबला नाहीतर यापेक्षा उग्र आंदोलन करू."
या निषेधार्थ आंदोलनकरते सुरेश जोशी, नागेश डोंगरे , विवेक खिलारे, कपिल हजारे, दिगंबर यादव, नाना जोशी, अनंत कुलकर्णी, सुहास जोशी, सुनील रत्नपारखी, अजित लेंडवे, प्रतीकराज पडवळे, सागर पवार, प्रवीण जाधव, आकाश तांबट, दामाजी पडवळे, विवेक चिंचकर, जयचंद जाधव,अंकुश वाकळे, दुर्गवा स्वामी, अजिंक्य पंडित, आदिजन उपस्थित होते.