प्रतिनिधी :-
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की,अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहिली नाही.पण मानवी रक्त तयार करण्याचं मात्र आजपर्यंत कोणतही मशीन तयार झालं नाही.त्यामुळे रक्तदान हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.
ए.डी फायनान्शिअल सर्विसेस,मंगळवेढा व एचडीएफसी बँक लिमिटेड, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला अनिल सावंत यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते.
रक्तदान शिबीराचे आयोजक नीरज ताड व अजय डांगे यांचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.यावेळी आयोजकांनी अनिल सावंत यांचा सत्कार केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी चंद्रशेखर कौंडूभैरी, संतोष रंदवे तसेच वारी परिवाराचे सदस्य सतीश दत्तू व अजय आदाटे आदी उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे व आयोजकांचे अशा उपक्रमांना पाठिंबा देत राहूया आणि समाजासाठी सकारात्मक बदल घडवूया. असेही बोलताना सावंत यावेळी म्हणाले.