वारी परिवाराच्या सन्मानातून निश्चित काम करण्याची प्रेरणा मिळेल :- ॲड राजू बामणे - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

वारी परिवाराच्या सन्मानातून निश्चित काम करण्याची प्रेरणा मिळेल :- ॲड राजू बामणे


मंगळवेढा:-

वारी परिवार या सामाजिक संस्थेने केलेल्या सन्मानातून मला भविष्यात न्यायालयीन क्षेत्रात काम करण्याची निश्चित प्रेरणा व ऊर्जा मिळेल असे मत ॲड.राजू बामणे यांनी व्यक्त केले ते वारी परिवाराच्या वतीने दिवाणी व फौजदारी न्यायालय मंगळवेढा येथे सहाय्यक सरकारी वकील ॲड राजू बामणे यांची केंद्रीय अन्वेशन ब्युरोच्या सरकारी वकीलपदी व नंदेश्वर येथील ॲड सागर पाटील यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल तर्फे सनद मिळाल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.


यावेळी विचारपीठावर सरकारी वकील ॲड धनंजय बनसोडे,ॲड भारत पवार,ॲड विश्वास देशमुख उपस्थित होते.सुरवातीस ॲड.राजू बामणे व ॲड.सागर पाटील यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल वारी परिवाराच्या वतीने सांप्रदायिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी ॲड.बामणे म्हणाले माझ्या सेवेत समाजातील शेवटच्या घटकाला सुद्धा न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. खरंतर माझे अनेकांनी बोलावून सत्कार केले पण वारी परिवाराने मात्र न्यायालयात येऊन गौरव केल्याबद्दल आभार मानले.


यावेळी ॲड.सागर पाटील म्हणाले न्यायदानाच्या क्षेत्रात पदार्पण करीत असताना सर्वच विधिज्ञाचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभेल असे सांगून वारी परिवाराचे आभार मानले.


याप्रसंगी सरकारी वकील ॲड धनंजय बनसोडे,ॲड रमेश जोशी,ॲड भारत पवार,ॲड धनंजय हजारे,कवी इंद्रजीत घुले यांनी देखील मनोगत व्यक्त करून अभिनंदन करून वारी परिवाराच्या सहकार्याबद्दल आभार मानले.


यावेळी न्यायालयातील सर्वच वकिलांना मंगळवेढे भूमी संतांची हे पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले यावेळी वकील बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,सर्व दिवाणी व फौजदारी विधिज्ञ,वारी परिवाराचे रामचंद्र दत्तू,विलास आवताडे,दत्तात्रय भोसले,मोहन आटकळे,चव्हाण महाराज,लहू ढगे,परमेश्वर पाटील,मनोज माळी,स्वप्निल टेकाळे,नाना भगरे,स्वप्निल फुगारे,सतिश दत्तू,आदी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर कृषीतज्ञ अजय आदाटे यांनी आभार मानले.


test banner