प्रतिनिधी
दहा वर्षापुर्वी भाजपवासी
झालेले ढोबळे सर हे परत स्वगृही शरद पवार गटात जाण्याची इच्छा त्यांनी नुकतीच बोलून
दाखवली आहे. एका खाजगी वाहिनीशी बोलताना त्यांच्या खास शैलीत त्यांनी अजित पवारांनवरची
खंत बोलून दाखवली कि “ सासूमुळे वाटणी केली आणि सासुच वाट्याला आली
” त्यामुळे भाजपात राहण्यात काही अर्थ नाही,
तसेच विद्यमान आमदारावर हि खोचक
टीका करत बोलले कि ,” कॉंट्रॅक्ट बेसवर वाढलेला आमदार आहे त्यांना
मोकळीक मिळावी म्हणून मी पक्ष सोडत आहे कारण त्यांनी २००० कोटीचा निधी आणला परंतु उद्घाटनाला माणसे मिळेना अशी गत झाली आहे ”
ढोबळे सर तालुक्याच्या
राजकारणात इफेक्ट पाडतील की नाही हा येणार काळ ठरवेल परंतु राष्ट्रवादी गटाचे इन कमिंग
जोरात सुरू झाले आहे हे मात्र नक्की