मंगळवेढा:-
कवी इंद्रजित घुले संपादित शब्दशिवार दिवाळी अंकाचे प्रकाशन धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाराचा यथार्थ अनुभव देणार्या या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सोलापूर रोडवरील रतिलात दत्तू यांच्या शेतात वारी परिवाराच्यावतीने करण्यात आले होते.
मंगळवेढा हे ज्वारीचं शिवार आणि संतभूमी आहे.भाकरीची आणि विचारांची भूक ज्या भूमीतून पुरवली जाते,ती ही भूमी आहे. सात्त्विकतेचा वसा आणि वारसा आपल्याला आहे.तो उपेक्षित राहू नये.
विचार देणारी माणसं आपल्या जवळ आहेत.आपल्याला ती भेटतात, बोलतात म्हणून जगणं समृद्ध होतं.अन्यथा आपण कोरडे राहिलो असतो.याच भूमिकेतून संपादक, कवी, प्रकाशक म्हणून इंद्रजित घुले शब्दशिवारचं दर्जेदार काम करीत आहे.
राज्यभरातून आणि मराठी वाचकातून प्रतिसाद मिळवत अव्वलस्थानी राहणं हे कसब शब्दशिवारने पूर्णत्वास नेलं आहे. असे उद्गार प्रकाशनाप्रसंगी काळुंगे सरांनी व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळ्यास धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई शिवाजीराव काळुंगे,अखिल भारतीय नाट्य परिषद राज्य नियामक मंडळ सदस्या तेजस्विनी सुजित कदम,बँक ऑफ महाराष्ट्र मंगळवेढा शाखेचे शाखाधिकारी निरंजन झिरपे,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्रीधर भोसले,यतिराज वाकळे,जतचे बीडीओ कवी आनंद लोकरे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,चाटे क्लासेसचे संचालक श्रीकांत काटे,जयंत पवार, प्रकाश मुळीक,महालक्ष्मी ज्वेलर्सचे अर्जून नागणे आदी मित्र परिवार उपस्थित होता.
निरंजन झिरपे, शोभाताई काळुंगे, तेजस्विनी कदम, श्रीधर भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.आकाशच मंडप आणि काळी कसदार जमीनच जिथं मंच होतो,तिथं शिवाराचा आणि शब्दशिवारचा अर्थ सार्थ ठरतो. या दिवाळी अंकाचे वाचनमूल्य खूप मोठे आहे. मोठे मोठे मान्यवर साहित्यिक अंकातून वाचायला मिळणं हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे,असे विचार मांडले.
प्रास्ताविकामध्ये संपादक इंद्रजित घुले यांनी रानगूज कवितेतून शिवाराचे संदर्भ मनावर कोरून ठेवले. शिवारात कार्यक्रम घेण्याचे औचित्य आणि त्या मागची भूमिका मुखपृष्ठाचे विवेचनाचे अभिवाचन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.
आभार संदीप घुले यांनी मानले यावेळी जनार्दन कोंडुभैरी, बाळासाहेब जावळे,मनोज वेदपाठक,दिपक घुले,मनोज माळी,मनोज वेदपाठक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन ढगे,सतीश दत्तू, प्रा.विनायक कलुबर्मे,अजय अदाटे,रतिलाल दत्तू दत्तात्रय भोसले,सुरेश माळी,प्रफुल्ल सोमदळे,हसन मुलानी,नाना भगरे,पार्थ भगरे आदींनी परिश्रम घेतले.