प्रतिनिधी:
तुतारी आम्हालाच मिळाली
आहे असे भालके आणि परिचारक समर्थक कार्यकर्ते सोशल मिडीयात पोस्ट टाकत आहेत.
दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी
एकाच चिन्हासाठी प्रयत्न करत आहेत हे चित्र पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात
नव्यानेच पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षात महाराष्ट्रात
खूप राजकीय उलथापालथ झाली आहे जिल्ह्यात आणि तालुक्यात हि फार झाली आहे.
त्यातच लोकसभेला जिल्ह्याचे
राजकारण समीकरण खूपच बदलले आहे.
मोहिते पाटील बॅक इन अॅक्शन
मोडवर आले आहेत त्यामुळे बरेच नेते स्वगृही परतत आहेत. आता पंढरपूर मंगळवेढा येथील राजकारण अजूनच क्लिष्ट आहे. भाजपाजी साथ सोडून परिचारक आघाडीत येवू पाहत आहेत. कार्यकर्ते त्यांना तसे आवाहन करत आहेत.
तर नुकतेच बि आर एस मध्ये
गेलेले भालके हेही आघाडीत येवू इच्छित आहेत.
आता हि जागा आघाडीतून
राष्ट्रवादीला शरद पवार गटातून तुतारी चिन्हावर लढा अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. कारण दोन्ही तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेला १० पैकी ८ जागा जिंकून जनतेच्या मनात विश्वास कमावला
आहे.
साहजिकच कार्यकर्ते मागणी
करत आहेत परंतु दोन्ही नेत्यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया देलेली नाही धक्का तंत्राने
काहीही होवू शकते. त्यामुळे अधिकृत घोषणा होई पर्यंत कार्यकर्ते
तुतारी वाजवत आहेत तर वाजवू द्या.