आपल्या कर्तव्याचे पालन करत सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे-डॉ मिनाक्षी कदम(दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयात नवनियुक्त प्राध्यापक सत्कार समारंभ संपन्न.) - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

आपल्या कर्तव्याचे पालन करत सर्वांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे-डॉ मिनाक्षी कदम(दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयात नवनियुक्त प्राध्यापक सत्कार समारंभ संपन्न.)


प्रतिनिधी:-

आज शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,कला व क्रीडा अशा अनेक क्षेत्रात इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज तसेच दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवून या संस्थेचा नावलौकिक वाढविला आहे तसेच यशाची परंपरा कायम राखली आहे.


त्यामुळे या संस्थेचा यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी प्राध्यापकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहिले पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेच्या अकॅडमिक ऍडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम यांनी दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालय मंगळवेढा येथे नवनियुक्त प्राचार्य व प्राध्यापक सत्कार समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केले.


तत्पूर्वी,शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा या संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम,उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम संस्थेच्या अकॅडमिक ऍडमिनिस्ट्रेटर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम,संचालिका व शिवशंभो पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,खजिनदार रामचंद्र नेहरवे,संचालिका अजिता भोसले,संचालक यतीराज वाकळे,ॲड.शिवाजी पाटील,दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड,इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र काशीद इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत  दलितमित्र करून गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सत्कार समारंभ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


त्यानंतर पुढे बोलताना डॉ.मिनाक्षी कदम म्हणाल्या की दलितमित्र कदम गुरुजींनी सुरू केलेल्या या ज्ञानमंदिरात आज पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी मिळत आहे ही सर्व मंगळवेढेकरांसाठी खूपच अभिमानाची बाब आहे. 


दलितमित्र कदम गुरुजींच्या विचारांचा वारसा घेऊन सर्वांनी हे ज्ञानदानाचे पवित्र काम जोमाने करायचे आहे.डॉ.सुभाष कदम यांनी ग्रामीण भागातील सामान्य घरातील मुलांचा विचार करून मंगळवेढा येथे विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केलेले महाविद्यालय अनुदानित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पण पुढे राजकीय हस्तक्षेपामुळे तब्बल बारा वर्षे बंद पडलेले महाविद्यालय ॲड.सुजित कदम यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा नुसते सुरू झाले नाही तर ते पहिल्याच वर्षी युवा महोत्सवाचे अप्रतिम असे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले.


यावेळी त्यांनी कॉलेज पुन्हा सुरू व्हावे यासाठी डॉ.सुभाष कदम,सुजित कदम,तेजस्विनी कदम सचिवा डॉ.प्रियदर्शनी महाडिक तसेच सर्व संचालक मंडळ व संस्थेतील प्रत्येक कर्मचारी यांनी घेतलेल्या कष्टाची सर्वांना आठवण करून दिली तसेच शेवटी नवनियुक्त प्राचार्य व प्राध्यापक प्राध्यापिकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


तत्पूर्वी या महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून सर्व नवनियुक्त प्राध्यापकांना शुभेच्छा देत त्यांची जबाबदारी व कर्तव्य यांची जाणीव करून दिली तसेच संतांच्या या भूमीत उद्याची एक सुसंस्कृत व सक्षम पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.


या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी नूतन प्राचार्य डॉ.राजेंद्र गायकवाड तसेच महाविद्यालयातील नूतन प्राध्यापक व प्राध्यापिकांचा संस्था परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.


तसेच महाविद्यालय पुन्हा जोमाने सुरू केल्याबद्दल संस्था परिवाराचा नूतन प्राध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे व आशपाक काझी यांनी केले तर आभार प्रा.पल्लवी भोजने यांनी मानले.


हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


test banner