प्रतिनिधी:-
शांतता रॅलीला लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित रहावे व रेकॉर्ड ब्रेक शांतता रॅली काढण्यात येणार आहे असे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले.
घरातिल वयस्कर लोक सोडून मुले, महीला भगीनी व बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहावे विद्यार्थ्यांनी शाळेला सुट्टी घ्यावी, नोकरदारांनी रजा काढावी व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकान बंद ठेवावे व शेतकऱ्यांनी 7 तारखेपर्यंत कामे उरकून रॅलीत सहभागी व्हावे रॅलीला येताना जेवण, पाणी,पावसामुळे पावसाचे साहित्य, भगवी टोपी,भगवा गमजा व पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट परिधान करावे.
वहाने सावकाश चालवावित, गडबड गोंधळ करू नये, मोटार सायकलच्या पुंगळ्या काढू नये.वेळे आगोदर वहाने पार्किंग च्या ठिकाणी लावावित, प्रत्येक मराठा बांधवांनी आपल्या गल्लीत, गावात, वाडी वस्तीवर जाऊन रॅलीचे निमंत्रण द्यावे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारी द्यावी प्रत्येक ठिकाणी सुचना असतिल त्या पाळाव्यात सोशल मिडिया व प्रिंट मीडिया,फोन व्दारे पुढील नियोजन वेळोवेळी कळवण्यात येईल.