श्री संत दामाजी महाविद्यालय कनिष्ठ विभागातील प्राची ढावरे व ओंकार नकाते यांनी तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून अव्वल स्थान पटकाविले.
सदरचे यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव व उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले विदयार्थ्यांनी योगासन स्पर्धेत मिळवलेले यश महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविणारे आहे असे सांगून अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.