मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सर्व शिवभक्तांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांची भेट घेऊन शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा परिसरातील सुशोभीकरण करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये सुशोभीकरणाचे काम दोन दिवसात सुरू न झाल्यास नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा सर्व शिवभक्तांनी इशारा दिला.
मंगळवेढा शहरांमध्ये शिवप्रेमी चौक येथे गट नंबर 26 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा या ठिकाणी परिसर सुशोभीकरण करणे या कामाची निविदा आचारसंहितेमुळे प्रलंबित होती.
आचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून तात्काळ निविदा उघडून सदर काम सुरू करण्याच्या आदेश ठेकेदार असे देण्यात यावे.या बाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे यांना देण्यात आले.
सदर प्रक्रिया दोन दिवसात म्हणजेच गुरुवार दिनांक 27 जून पर्यंत पूर्ण न झाल्यास मंगळा शहरातील व तालुक्यातील समस्त शिवभक्त नगरपालिकेसमोर लय मोठ्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी अजित जगताप, चंद्रकांत पडवळे, प्रवीण खवतोडे , गौरीशंकर बुरकुल, सोमनाथ माळी, राहुल सावंजी, संभाजी घुले, ज्ञानेश्वर कोंडूभैरी, गणेश सावंजी, सतीश दत्तू, हर्षद डोरले, आनंद मुढे, सुदर्शन यादव, सुशांत हजारे, अजिंक्य घुले, रविराज शिंदे, राहुल दत्तू, सचिन साळुंखे, विक्रम शेंबडे, अनिकेत हजारे, सुधीर भगरे, मनोज बाबर, तोशिब बागवान, अजय गाडे, प्रशांत खवतोडे, हरी दत्तू, चंद्रकांत चेळेकर, रविकिरण जाधव, विजय हजारे, विनायक हजारे आदी. शिवभक्त उपस्थित होते.