मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न.या विषयाचे देणार निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २६ जून, २०२४

मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न.या विषयाचे देणार निवेदन.


मंगळवेढा:-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मंगळवेढा येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा यांच्या निवासस्थानी पार पडली.


यावेळी नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर व महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले त्याबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानून निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.


त्यांनतर आपला माणूस निवडून आल्यामुळे कार्यकर्त्यां मध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.आता येणाऱ्या विधानसभे मध्ये पण असेच यश महविकास आघाडीला मिळावे म्हणून प्रयत्नाची पराकष्टा करण्याचे वचन दिले.


तसेच बी बियाणे,रासायनिक खते कीटकनाशके व इतर शेती उपयोगी साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.


शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साधनांना रासायनिक खतांना मोठ्या प्रमाणात जीएसटी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण निर्माण होत आहे.बी बियाणे रासायनिक खतांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.


मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका असून देखील तालुक्यामध्ये अद्यापही चारा डेपो व चारा छावण्या सुरू करण्यात आल्या नाहीत.


तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारचे दुष्काळी अनुदान मिळाले नाही.त्यानंतर दूध दराचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.


सत्ताधाऱ्यांकडून हे शेतकऱ्यांचे सरकार म्हणून वारंवार सांगण्यात येत आहे तरीही मंगळवेढ्यातील शेतकरी अद्यापही अनुदानापासून पिक विम्या पासून वंचित आहेत.


सत्ताधाऱ्यांनी विकासाचा नारा देत देशाला महाशक्तिशाली बनवण्याचं सांगितलं होतं पण मंगळवेढा मतदारसंघातील तालुक्यातील रस्ते पिण्याचे पाणी शेतीला पाणी नसल्यामुळे शेती करणे अडचणीचे झाले आहे.


शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा पिक विमा मिळला नाही व काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले त्या पडझड झालेल्या घरांचे नुकसान भरपाई देखील अद्याप मिळाले नाही त्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.मंगळवेढा हा तालुका पवार साहेबांच्या विचारांना मानणारा तालुका असल्याने या वेळी उमेदवार हा मंगळवेढा तालुक्यातून द्यावा त्यावेळी सर्व उपस्थितांकडून सर्वांशी चर्चा करून राहुल शहा यांनी दोन किंवा तीन संभाव्य उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे द्यावेत असे सर्वानुमते ठरले.


शेवटी बोलताना राहुल शहा म्हणाले की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट हा तालुक्यातील प्रत्येक गावात जनमानसात पोहोचवण्यासाठी व पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 


पुढे बोलताना ते म्हणाले की आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी जो उमेदवार देतील तो निवडून आणू.

 

यावेळी चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, अंबादास बेंद्रे,यादव आवळेकर,दादा पवार, मुजफ्फर काझी,अण्णा राऊत,बजरंग ताड, किसन गवळी,सदाशिव माळी,उमाकांत चिंचकर,लक्ष्मण कट्टे,वैभव पाटील,जमीर इनामदार,संतोष रंदवे,बबन ढावरे,नवनाथ शिंदे,दादा भगरे,निमंगरे,मुलानी सर,पंडित गवळी,कटारे सर,महादेव माळी, नवनाथ यादव,बंडोपंत पाटील,महादेव जिरगे,जैनुद्दीन पटेल,सागर गुरव, सचिन वडतिले,वैभव ठेंगील,शब्बीर रांगेकर,काका मोरे,अजय ढेकळे,नानासाहेब करपे,अनिल आदलिंगे,नागनाथ क्षीरसागर, सत्यवान लेंडवे,सैफ अली शेख,चेतन पाटील,राहुल चौगुले,नवनाथ बिराजदार,आकाश पाटील,समाधान यादव,विजय पवार,सुनील गवळी,राजेंद्र आमुंगे आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


test banner