झाडांना खत व पाण्याची गरज तशी मुलांना संस्काराची गरज :- हभप सुधाकर इंगळे. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १० जून, २०२४

झाडांना खत व पाण्याची गरज तशी मुलांना संस्काराची गरज :- हभप सुधाकर इंगळे.


मंगळवेढा -

झाडांना जागविण्यासाठी खत व पाण्याची जशी गरज असते तशी आज मुलांना योग्य त्या संस्काराची गरज आहे असे मत अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीयअध्यक्ष हभप सुधाकर महाराज इंगळे यांनी व्यक्त केले ते मेसर्स गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्स यांच्यावतीने मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण व गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभात बोलत होते.


यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने,आगार प्रमुख संजय भोसले,उद्योजक संजय आवताडे,जयदीप रत्नपारखी उपस्थित होते. सुरवातीस तुलसी पूजन करण्यात आले.यावेळी रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्याना गौरविण्यात आले.तसेच पोलीस स्टेशनच्या परिसरात सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी इंगळे महाराज म्हणाले जो विद्येचे ग्रहण करतो तोच विद्यार्थी असतो मोठे व्हा,शिकत रहा,जो शिकेल तोच जीवनात यशस्वी होईल विदयार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे परिवारातील प्रेम टिकविता आले पाहिजे पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन सुधारणे ही काळाची गरज आहे यासाठी तरुणांनी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


संजय आवताडे म्हणाले झाडांचे आणि मुलांचे वृद्धिंगत होणे सारखेच असते झाडांची जशी मशागत केली जाते तसेच मुलांवर संस्कार करावे लागतात यशाला शॉर्टकट नसतो मोबाईल पासून दूर राहून कष्टाने व आत्मविश्वासाने यशाचे शिखर गाठा असे सर्वांचे अभिनंदन केले.


यावेळी रणजीत माने यांनीही विदयार्थ्यांनी लावलेल्या झाडांचे निश्चितच संवर्धन केले जाईल असे सांगून त्यांनी रत्नपारखी ज्वेलर्सचे आभार मानले वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व शालेय मुलांना कळावे यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास एपीआय वाघमोडे,वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू,दत्तात्रय भोसले,प्रफुल सोमदळे,ज्ञानेश्वर कौडूभेरी,संभाजी घुले,गणेश यादव,दिगंबर यादव,डी एन जाधव,पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी,विध्यार्थी,पालक,निसर्गप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले तर जयदीप रत्नपारखी यांनी आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नपारखी ज्वेलर्सचे सर्व कर्मचारी व वारी परिवाराने विशेष परिश्रम घेतले.



test banner