मंगळवेढा:-
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी मंगळवेढ्यात उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार स्वामी यांना देण्यात आले.
यामध्ये मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले असून त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे यातून त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र शासन जबाबदार असेल मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईमध्ये सगेसोयरे यांचा आरक्षणामध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते परंतु विशेष अधिवेशनामध्ये सगेसोयऱ्याचा विषय न घेता मागणी नसणारे आरक्षण देऊ केलेले आहे.
त्यामुळे मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालातून दिसून आला तरी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेला सगेसोयरेचा कायदा लवकर पारित करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच डोंगरगाव मधील बहुसंख्य मराठा बांधव अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गेलेले आहेत.यावेळी मंगळवेढा तालुका सकल मराठा समाजाचे बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.