श्री संभाजी तानगावडे व श्री कांताराम बाबर यांना राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ७ जून, २०२४

श्री संभाजी तानगावडे व श्री कांताराम बाबर यांना राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंंडवे चिंचाळे ता. मंगळवेढा येथील शिक्षक संभाजी बजरंग तानगावडे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोमनाळ येथील विषयशिक्षक कांताराम बाबर यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श सेवा सन्मान पुरस्कार गुरुदक्षिणा हॉल नाशिक येथे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमांस महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य अध्यक्ष दीपक चामे व सर्व राज्य समन्वयक आणि सोलापूर जिल्हा समन्वयक भीमाशंकर तोडकरी व निवास माळी , सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक श्री संजय चेळेकर सर, दामाजी सोसायटीचे माजी चेअरमन श्री शिवाजी लेंडवे, सुहास लेंडवे उपस्थित होते. सदर निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री बिभीषण रणदिवे आंधळगांव केंद्राचे केंद्रप्रमुख विष्णू चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे .      संभाजी तानगावडे यांनी सन २०२२-२३ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून १० विद्यार्थी पात्र झाले असून एका विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षकांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

test banner