उद्धव साहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक येतील : दत्तात्रय भोसले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

उद्धव साहेबांच्या सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक येतील : दत्तात्रय भोसले.


मंगळवेढा : प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेतील विचार ऐकण्यासाठी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे मंगळवेढा शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून सरकारच्या शेतकरी विरोधी,बेरोजगारी व महागाईच्या बाबतच्या धोरणाचा जनतेला कंटाळा आला असून बदल निश्चित आहे.पंढरपूर विधानसभा अंतर्गत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागामधील शिवसैनिक निष्ठावंत असून महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासोबत निवडणूक प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून सक्रिय झाला असून गावोगावी परिवर्तनाची लाट असून सोलापूर येथील सभेला उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असून शहरातील पदाधिकारी देखील सोमवारी होणाऱ्या सभेसाठी तयारी करीत आहेत.


सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवेढा तालुक्यामध्ये तालुकाप्रमुख येताळा भगत, तुकाराम भोजने हे उद्धव साहेबांच्या सभेसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत अशी माहिती शहर प्रमुख दत्तात्रय भोसले यांनी सांगीतली.


test banner