प्रतिनिधी:-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर शहराध्यक्ष माननीय श्री.राजवीर हजारे यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलेला असून मंगळवेढ्यातील एमपीएससी परीक्षा देऊन पास झालेले सरकारी दवाखान्यातील वर्ग चार येथील उपरोक्त संदर्भीय कार्यालयाच्या आस्थापनेवर नवीन चार कर्मचारी नव्याने रुजू करण्यात आले असून हे सर्व श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर अध्यक्ष माननीय श्री राजवीर हजारे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले असून.
मंगळवेढा शासकीय रुग्णालय येथील भोंगळ कारभार पाहून तेथील कर्मचाऱ्यांची कमतरता पाहून व रुग्णांची होणारी हेळसांड पाहून व तेथील असणाऱ्या रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा दाब पाहून मी राजवीर हजारे व आमच्या मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक निवेदन पत्र अर्ज दिनांक १५.०३.२०२४ रोजी तयार करून सोलापूर कार्यालयाला दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब पंधरा दिवसाच्या आत मध्ये मनसेच पत्र मिळाल्यानंतर लगेच चार कर्मचारी कार्यालयात नव्याने रुजू करण्याचे आदेश जारी केले.
त्यामुळे मनसे शहराध्यक्ष राजवीर हजारे यांनी सोलापूर येथील कार्यालयातील अधिकाऱ्याचे आभार मानले. त्यांनी आमच्या पत्रास ताबडतोब लक्ष घालून त्यावर लगेचच चार कर्मचाऱ्यांची पत्र जारी करून विशेष म्हणजे मंगळवेढ्यातील स्थानिक लोकांनाच कामावर म्हणजेच त्यांची मंगळवेढा सरकारी रुग्णालयात निवड करण्यात आली हेच आम्हाला महत्त्वाचा आहे आणि तसेच त्यांच्या या भरती मुळे सरकारी रुग्णालय येथील अतिरिक्त कामाचा दाब कमी करण्यास मदत होईल.
त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सोलापूर येथील अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देतो व मंगळवेढ्यातील सरकारी रुग्णालयात जो काही कामाचा अतिरिक्त बोजा होता तो कमी होण्यास मदत झाली असून इथून पुढे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही सरकारी कार्यालय असो इथे देखील आम्ही अशाच पद्धतीचं काम करू व केलेले आहे आपल्या मंगळवेढा शहरातील सिटीसर्वे ऑफिसमध्ये देखील अशाच पद्धतीची रिक्त पदे अजूनही अद्यापही भरलेले नसून त्यावरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने पुणे येथील कार्यालयात पत्रव्यवहार केला असून तेही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आशा आहे.
म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो आणि बोलतो देखील आणि सांगतो देखील प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे असेल अशी माहिती माननीय श्री म्हणून राजवीर हजारे शहराध्यक्ष मनसे मंगळवेढा यांनी दिली आहे.