प्रतिनिधी:-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसकडून सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
त्यामध्ये पुणे सोलापूर कोल्हापूर अशा सात मतदारसंघांचा समावेश आहे.सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रणिती शिंदे यांच्या नावावरती शिक्का मोर्तब झाला आहे.
तसेच आणखी 6 लोकसभा मतदार संघात देखील उमेदवारी जाहीर झाली आहे ती खालील प्रमाणे:-
कोल्हापूर:- शाहू महाराज.
अमरावती:- बळवंत बसवंत वानखेडे.
नंदुरबार:-गोवाळ पाडवी.
नांदेड:- वसंतराव चव्हाण
सोलापूर:- प्रणिती शिंदे.
लातूर:- डॉ. शिवाजीराव काळगे.
पुणे:-रवींद्र धंगेकर
अशी 7 मतदार संघातील पहिली यादी काँग्रेस ने जाहीर केली आहे.
यामध्ये माहविकास आघाडी मधील शिवसेना उबाठा.गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केले आहे.
यामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येकानी गावभेट दौरे करून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आडचणी सोडवण्यासाठी दौऱ्याच्या आयोजन केले गेले आहे.
यामध्ये त्यांना मराठा समाजातील लोकांच्या रोशाला देखील सामोरे जावे लागत आहे.
मराठा समाजातील लोकांनी पुढाऱ्यांना गावबंदी केलेले आहे. यावर काल सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नेत्यांना गावबंदी करण्यापेक्षा भाजपच्या नेत्यांना घरबंदी करणे गरजेचे आहे. पंढरपूर येथील गाव भेटी दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.