भाजपने देशात द्वेष पसरवण्याशिवाय दुसरे कुठलेही काम केलेले नाही. - निरंजन टकले - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २० मार्च, २०२४

भाजपने देशात द्वेष पसरवण्याशिवाय दुसरे कुठलेही काम केलेले नाही. - निरंजन टकले


मंगळवेढा:-

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहर व तालुका काँग्रेस कमिटी तसेच इंडिया (महाविकास) आघाडी यांच्यावतीने शहर आणि तालुक्यातील आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी "मारुती पटांगण, मंगळवेढा" याठिकाणी सायंकाळी ६.०० वाजता "हुकुमशाही विरुद्ध लोकशाही" या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होते. येथील संकल्प सभेमध्ये अभ्यासू,धाडसी व परखड असे ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले यांनी समस्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.


काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी सदरील मेळावा/शिबीराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.


आजच्या संकल्प मेळाव्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार,शहर जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे, ग्रामीण कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे,विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, चेतन नरोटे, प्रकाश पाटील,मनोज यलगुलवार,मुझमील काझी,पांडुरंग चौगुले,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,राजाभाऊ चेळेकर,विनोद भोसले,मनोज माळी, अॅड रविकिरण कोळेकर,पांडुरंग जावळे, अजय अदाटे आदीसह काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मंगळवेढेकर उपस्थित होते.


यावेळी बोलताना पत्रकार टकले म्हणाले की, मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात आपल्या देशातील जनता अनेक प्रकारच्या यातना भोगत आहे. आता,त्यांना जाब विचारून सत्तेवरून घालवण्याची वेळ आली आहे. त्यांना सर्वांनी आता तडीपार करून नवीन भारत घडविण्याचा संकल्प करूयात.


माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, मी इथला लोकप्रतिनिधी असताना विदर्भ अनुशेष ची अट रद्द करून मंगळवेढा उपसा योजना मंजूर केले. दोन वेळा चुक झाली आता तिसरी चूक करू नका. सोलापूरच्या विकासासाठी उजनीचे पाणी ते, सोलापूर विद्यापीठ यांसारख्या अनेक योजना आणल्या. 


परंतु, मागील दहा वर्षांत भाजप सरकारने फक्त भुलभुलैय्या केला आहे, येणारी सार्वत्रिक निवडणूक ही "लोकशाही विरुद्ध हुकूमशाही" अशीच असणार आहे, मंगळवेढा नागरिकांनी ह्या निवडणुकीमध्ये देशात लोकशाही व्यवस्था टिकविण्यासाठी काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे.


अभिजित पाटील यांनी सुद्धा मोदी सरकार वर टीका करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे मनोगत मांडले. सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.


test banner