सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून यांना उमेदवारी जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २५ मार्च, २०२४

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून यांना उमेदवारी जाहीर.प्रतिनिधी:-

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमी वरती सोलापूर जिल्हा लोकसभा मतदार संघात भाजप कडून उमेदवार  जाहीर करण्यात आला आहे. 


यामध्ये भाजपकडून सोलापूर जिल्हा लोकसभा उमेदवार म्हणून माळशिरसचे आ.राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


भाजपकडून उमेदवारांची दुसरी  यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादी मध्ये महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे.


सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार स्वामी जयसिद्धेश्वर यांचं यावेळी तिकीट कापण्यात आलेले आहे.


तसेच त्या तीन जागांमध्ये भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होता. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


तसेच गडचिरोली चिमूर मधून अशोक नेते यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे.


जवळपास 23 ते 25 जागांवर भाजप लढणार असल्यास निश्चित झाला आहे.


माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कामाला सुरुवात केली विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आता तर प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध राम सातपुते अशी लढत लागणार आहे.


test banner