प्रतिनिधी:-
बारामती लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट आला आहे.बारामती लोकसभा मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत लागणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघामध्ये अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये अजित पवार गट सुनील तटकरे यांच्या कडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्रातून सर्वात चुरशीची निवडणूक म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहिले जाणार आहे.
बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ह्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सुनेत्रा पवार यांनी गाव भेट दौरे करून जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे.
या आधी अजित पवार यांनी भाषणादरम्यान अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे संकेत दिले होते.
यावर आता अजित पवार गटाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे.सुनेत्रा पवार ह्या २०१० मध्ये स्थापन झालेल्या एनजिओ एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या संस्थापक असून त्यांचा समाजसेवेच्या कार्यात सक्रिय सहभागी असतात.
या आधी बारामती लोकसभा मतदार संघामधून सुप्रिया सुळे या तीन वेळा बारामतीच्या खासदार झाल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यामुळे व दोन गट झाल्यामुळे बारामती मधील ही लढत चुरशीची होणार आहे.