प्रतिनिधी:-
मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी ब्रह्मपुरी गावचे पंडित पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी मंगळवेढा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
मंगळवेढा तालुक्यात काँग्रेस पक्षाला ओळख निर्माण करून देण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांचा कार्याची दाखल घेऊन मंगळवेढा तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यास दिली आहे.
तसेच पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम मध्ये,सामजिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.पक्ष वाढीसाठी व बळकटीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अर्जुन तात्या पाटील,संतोष पाटील,जिल्हा सरचिटणीस पांडुरंग जावळे,राजू ठेंगिल, श्रीशैल्य माळी, अप्पू बोरकडे,बळवंतराव कोळी,वाल्मीक लोखंडे,विठ्ठल बेदरे आदी.मान्यवर,काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते.