स्व.महादेवराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमांचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १ एप्रिल, २०२४

स्व.महादेवराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमांचे आयोजन.


मंगळवेढा:-

सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन या संस्थेचे माजी ज्येष्ठ संचालक स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांनी दिली आहे.


या कार्यक्रमामध्ये आज सोमवार दि. १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता नामवंत कीर्तनकार ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर यांच्या कीर्तनाची सेवा संपन्न होणार आहे व त्यानंतर दुपारी १२वाजून १५ मिनिटांनी पुष्पवृष्टी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे.


सर्व नियोजित कार्यक्रम आ.समाधान आवताडे जनसंपर्क कार्यालय खंडोबा गल्ली मंगळवेढा येथील प्रांगणामध्ये संपन्न होणार आहेत.


तरी वरील सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे,श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे,आ.समाधान आवताडे,आवताडे शुगर्स चे चेअरमन संजय आवताडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सोमनाथ आवताडे परिवारातील इतर सदस्यांनी केले आहे.


test banner