विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा आनंद आणि सुख देणारा असतो :- राहुल गिरी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा आनंद आणि सुख देणारा असतो :- राहुल गिरीमंगळवेढा:-

महाविद्यालययीन जीवनात विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा विद्यार्थ्यांना आनंद आणि सुख देणारा असतो असे मत युवा व्याख्याता राहुल गिरी यांनी व्यक्त केले ते श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एन बी पवार होते.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


यावेळी व्याख्याते राहुल गिरी म्हणाले कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी संख्या यावरूनच महाविद्यालयाचे यश दिसून येते मात्र या यशापर्यंत पोहोचण्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग खूप खडतर आणि कष्टाचा असतो आजचा काळ हा समाजाच्या पतनाचा काळ आहे. 


त्यासाठी चांगल्या विचारांचे आदान प्रदान होईल ही अपेक्षा ठेवून मी इथे आलो आहे आजच्या तरुण पिढीची वाट चुकते,दिशा चुकते आहे असे अनेक वेळा म्हटले जाते हे वास्तव आहे.


याची कारणे कधीतरी शोधणे आवश्यक आहे मोबाईलचा डेटा संपत नाही म्हणून अस्वस्थ होऊन झोपणारी ही आजची तरुणाई आहे. मोबाईल हे तंत्रज्ञान चांगले आहे पण,तिचा प्रमाणापेक्षा जास्त वापर तरुणाईवर अधिराज्य गाजवीत आहे हेही तितकेच खरे आहे. 


आजच्या तरुणाईचे मानसिक स्वास्थ या मोबाईलच्या अतिवापराने बिघडत चालले आहे अशा काळात या तरुणांनी यातून पोहून निघायचं की, बुडून मरायचं हे ठरवायला हवं आज तुम्ही तरुण आहात तरुण कोणाला म्हटले जाते जो बुडत्या समाजाला तारून नेतो तो खरा तरुण असतो हे आजच्या तरुणाने समजून घ्यावे तसेच आपले आदर्श कोण असावेत हेही ठरवण्याची वेळ आली आहे.


त्यासाठी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा फेसबुक लाइक्स वाढवण्यापेक्षा आपली लायकी वाढवण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या आई-वडिलांची मान सन्मानाने उंचावेल यासाठी प्रयत्न करा कितीही मोठे झाला तरी माय,माती आणि माणुसकी विसरू नका आपले पाय जमिनीवर ठेवा यावेळी अनेक दाखले देत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ एन बी पवार म्हणाले की आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणी असून त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेऊन पोहोचवला आहे आणि महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे. 


महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवंत व्हावेत,विविध पदावरती विराजमान होऊन एक चांगल्या पद्धतीचे कार्य त्यांच्याकडून घडावे यासाठी महाविद्यालयामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्याचाच फायदा घेऊन अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर झाले तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ मोठे अधिकारीही झालेले आहेत.


अनेक विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये विद्यापीठाची सुवर्णपदकेही मिळवलेली आहेत विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधारित कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र असून त्या माध्यमातून अनेक ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत.


त्याचा उपयोग विद्यार्थ्याबरोबरच प्राध्यापकांनाही नेट,सेट सारख्या परीक्षेसाठी व पीएच डी सारख्या संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहे असे सागंत त्यांनी महाविद्यालयाच्या यशस्वीतेचा व प्रगतीचा आलेख मांडला.


यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली तसेच महाविद्यालयातील यश प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री विद्या विकास मंडळाचे सर्व संस्थापक सभासद,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ विभागाचे कार्याध्यक्ष प्रा उत्तम सुर्यगंध, शिशिक्षकेतर कर्मचारी विभागाचे कार्याध्यक्ष वसिम सुतार, सर्व विद्यार्थी प्रतिनिधी,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक,प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्वागत गीत प्रियंका क्षिरसागर हिने गायले तर पाहुण्यांचा परिचय प्रा विनायक कलुबर्मे यांनी केला सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर वरिष्ठ विभागाचे कार्याध्यक्ष व मराठी विभाग प्रमुख डॉ औदुंबर जाधव यांनी आभार मानले.test banner