मंगळवेढा-
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ४८ व्या वर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २४८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले सदर रक्तदान शिबिराचे उदघाट्न डॉ उदयसिंह दत्तू व डॅा नितीन चौंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी डॅा शरद शिर्के,डॉ विवेक निकम,डॅा विजय दत्तू,डॉ नितीन आसबे,डॅा दशरथ फरकंडे,मंडळाचे अध्यक्ष गणेश सांवजी यांचेसह मंडळांचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असताना सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने रेवनील ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान हेच खरे जीवदान आहे हा विचार तरुणांच्या मनामध्ये रुजविण्याचे कार्य केले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सदर मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश सांवजी व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.