मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात प्राचार्य प्रो डॉ एन बी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीए करीअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्वेरी महाविद्यालयाचे प्रा करण पाटील व प्रा उत्तम अनुसे यांनी विद्यार्थ्यांना एमबीए या शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षा पासून ते एमबीए पूर्ण झाल्यानंतर असणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी वाणिज्य विभागातील प्रा.भोसले एस एस यांनी सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रशांत धनवे यांनी मानले यावेळी वाणिज्य विभागातील प्रा.सावंत आर एस व इंग्रजी विभागातील प्रा राठोड तसेच वाणिज्य व कला विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.