कुणबी दाखल्यांची प्रमाणपत्रे द्या मंगळवेढा सकल मराठा समाजाचे निवेदन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

कुणबी दाखल्यांची प्रमाणपत्रे द्या मंगळवेढा सकल मराठा समाजाचे निवेदन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या कुटुंब धारकांना याबाबतची माहिती शासकीय कार्यालयातून उपलब्ध व्हावी व ग्रामपंचायत कार्यालयात ती देण्यात यावी व संबंधित लोकांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत अशा मागणीचे निवेदन मंगळवेढा तहसील येथे सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.


मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडल्या नंतर सरकारने शासकीय दप्तरी ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आहेत त्याची तपासणी सुरू करून कुणबी नोंद असलेल्या मोडी लिपीतील नागरिकांना त्यांच्या कुणबी नोंदी बाबत माहिती देण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर मंगळवेढा तालुक्यामध्ये 70 कुणबी नोंदी अद्याप पर्यंत मिळालेल्या आहेत.


परंतु ते दस्तऐवज मोडी लिपीत असल्यामुळे या संदर्भात माहिती उपलब्ध व्हावी मुख्यमंत्र्याच्या आदेशाप्रमाणे त्याचे मराठीत रूपांतर करून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर लावावे तसेच संबंधित लोकांना त्याची माहिती देऊन त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते.


test banner