मंगळवेढा शहरात या कामासाठी निधी मंजूर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ४ फेब्रुवारी, २०२४

मंगळवेढा शहरात या कामासाठी निधी मंजूर.


मंगळवेढा:-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल सोलापूरऱ्या दौऱ्यावरती असताना एका कार्यक्रमा प्रसंगी बोलत असताना म्हणाले की,


अजित जगताप यांनी मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे त्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी काही दिवसांपूर्वी निधी मागितलेला होता.


पुढे बोलताना ते म्हणाले की त्यांना त्यांच्यामध्ये निधी देण्या संदर्भात संबधित अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


पुढे बोलताना पवार म्हणाले की कार्यकर्त्यांना सूचना देत म्हणाले की,शेवटी आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे हे महापुरुष व राजमाता जिजाऊ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सगळ्या ज्या महिला होऊन गेल्या तसेच जे महापुरुष होऊन गेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे.


पुढे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे अध्यक्ष अजित जगताप म्हणाले की मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या तिन्ही युग पुरुषांच्या मूर्ती परिसर सुशोभीकरणासाठी जिल्हा अधिकारी  व त्या संबधित अधिकाऱ्यानं समवेत बैठक घेतली आहे.


बैठक घेऊन अर्थ खात्याच्या अंतर्गत नगरस्थान  योजनेतून निधी मंजूर केला असल्याचे अजित जगताप यांनी सांगितले.


test banner