मनसेचे राजवीर हजारे यांनी श्रीकृष्ण तलावात संत सृष्टीच्या मागणीसाठी घेतली राज साहेब ठाकरे यांची भेट. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ७ जानेवारी, २०२४

मनसेचे राजवीर हजारे यांनी श्रीकृष्ण तलावात संत सृष्टीच्या मागणीसाठी घेतली राज साहेब ठाकरे यांची भेट.



                   खरंतर मंगळवेढा शहरातील विकासाच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नसतं कारण मंगळवेढा नगरपरिषदेत आज पर्यंत केलेली मागील वीस पंचवीस वर्ष पासून नगरसेवकांनी केलेली कामे व आत्ता सुरू असलेली कामे खूप फरक आहे आत्ता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहराच्या वतीने एक मागणी केली आहे.

                 ती म्हणजे अशी श्रीकृष्ण तलाव 46 एकरामध्ये पसरलेला आहे परंतु 25 ते 30 वर्षे झाले त्याच्याकडे सर्व नागरिकांचे नगरपालिकेचे तहसीलदारांचं सर्व सरकारी अधिकाऱ्यांचं कधीच त्याच्याकडे लक्ष गेलेलं नाही व त्यावर असा एखादा चांगला जेणेकरून मंगळवेढ्याच्या विकासात थोडीशी भर पडेल असा कोणताच विचार कोणाच्याच मनामध्ये आजपर्यंत आलेला नाही.

               परंतु मी सातत्याने मागील काही वर्षांपूर्वी सुद्धा इस्कॉन टेम्पल ला तिथे मंदिर बांधण्यासाठी म्हणून पुढाकार घेतलेला होता परंतु त्यांची अट वेगळी असल्यामुळे ते होऊ शकलं नाही त्याचवेळी मी ठरवलं की या श्रीकृष्ण तलावाला साक्षात पांडुरंगाचे पाऊल व पांडुरंगाचा सहवास लागलेला असून त्यामध्ये आपणास संतसृष्टी उभा करायची असून त्याकरिता 46 एकरामध्ये संत सृष्टी कशी उभा करता येईल व त्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना असतील यासाठीच मी माननीय श्री राज साहेब ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

              पुढच्या काही दिवसात मला परत मुंबईला बोलवलेला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंगळवेढा शहर यांच्या वतीने आमच्या  पक्षाच्या सीएसआर फंडातून काही मदत होते का या संदर्भात सुद्धा मी साहेबांशी बोललेलं असून तेही प्रश्न मार्गी लागेल हे नक्की आहे परंतु यासाठी थोडासा वेळ जाणार असून याकरिता सर्व नागरिकांनी राजवीर हजारे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे व येत्या काही दिवसात तुम्हाला आणखी सहा मागण्या कोणत्या आहेत त्या सुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत एका पत्राद्वारे पोहोचवल्या जातील व त्या मागण्या मागणीचा अभिप्राय सुद्धा मला तुम्ही माझ्या व्हाट्सअप नंबर ९८९०८४७७८४वरती कळवाल अशी आशा आहे.

              प्रत्येक घरामध्ये मी त्या सर्व ७मागण्या मंगळवेढा शहराच्या विकासाचा दृष्टिकोनातून आहेत त्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला थोड्याच दिवसात आपल्याला एक सही विकासाची या संकल्पनेतून तुमच्यासमोर मांडण्यात येईल.आणि मला  खूप बरं वाटलं माझे सर्व मुद्दे साहेबांनी समजून घेतल्याबद्दल. आपला माणूस राजवीर हजारे.



test banner