तनिष्का सावित्रीमाई वाचनालय चे हुन्नूर येथे प्रशांत साळे यांच्या हस्ते उद्घाटन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ७ जानेवारी, २०२४

तनिष्का सावित्रीमाई वाचनालय चे हुन्नूर येथे प्रशांत साळे यांच्या हस्ते उद्घाटन.                       मंगळवेढा:सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हुन्नूर (मंगळवेढा )मध्ये "तनिष्का सावित्रीमाई फुले वाचनालय" प्रशांत साळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस ग्रामीण कार्यालय येथे ॲग्रीकॉस एक्सपोर्ट च्या मार्फत चालू करण्यात आलेले आहे.

                   सावित्रीमाई फुले वाचनालयच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकातील विद्यार्थी, युवकांना पुस्तक पेढीच्या माध्यमातून सर्वागीण विकास साधता येतो. या सुसज्ज वाचनालयात स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध असून स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,' असे आवाहन काँग्रेस मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले. हून्नुर येथील सावित्रीमाई फुले वाचनालयाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते.

                   असे म्हणाले की , 'वाचनालयांतून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. अनेकांच्या आयुष्याची जडणघडण पुस्तकांनी केली आहे. वाचनालयात कथा, कादंबरी, ललित, बाल साहित्य, वाड्मय साहित्यातील पुस्तकेही उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून सर्व महिला आणि परिसरातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी यांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. 

             


    सावित्रीबाई फुले या वाचनालयामध्ये स सर्व प्रकारचे वर्तमानपत्र हे दररोज वाचायला मिळतील त्यामुळे आपणास सर्व महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या घडामोडी समजतील.

                  शेतीविषयक नवीन लागवड , त्यावर येणारे कीड रोग तसेच लागवडीनंतर चे मार्गदर्शन या कार्यालयामध्ये मोफत केले जाणार आहे.  सावित्रीबाई फुले वाचनालयाकडून महिन्याला सर्व ग्रामवासियांसाठी एक वेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन शिबिर घेण्याचा संकल्प आहे. अशी माहिती अजय आदाटे यांनी या निमित्ताने बोलताना दिली.

महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी यंत्रणा :

सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने सुरू आलेल्या वाचनालयत प्रशांत साळे यांनी तनिष्का व गावातील इतर महिलांच्या अडीअडचणी सोडविन्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू केली आहे. ही यंत्रणा गावातील स्त्रियांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, कौटुंबिक भांडण-तंटा असो या शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचे काम असो, त्यासाठी एक वेगळी यंत्रणा काम करणार आहे. यामुळे स्त्रियांची शासन दरबारात अडकलेली कामे तातडीने मार्गी लावण्यास मदत होणार आहे.


              ॲग्रीकॉस एकस्पोर्टस् प्रा. लि., पुणे येथील कंपनीच्या वतीने संचालक अजय आदाटे व मंगळवेढा येथील लेखक प्रकाशक इंद्रजित घुले या दोघांनी विविध प्रकाशनाच्या पुस्तकांचे संच भेट दिले. यावेळी तनिष्का गटप्रमुख सुवर्णा भंडारे, चांदबेवी सुतार, इंताज सुतार,

               शमा सुतार, अमिना सुतार, फुलाबाई कोळी, वजीरबी मुलाणी, सुसाबाई धनवडे, संतोष क्षीरसागर, संदीप पवार, शिवदास पुजारी, शरद गावडे, संजय कांबळे, बिरा पुजारी, दगडू सुधार, सुशांत माने, अरुण भंडारे, सचिन बाघमारे, सुरेश चव्हाण, पांडुरंग करंडे, रवी फाटे, शंकर पुजारी, भाऊसाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते. अजय आदाटे व प्रशांत साळे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी सकाळ व्यासपीठाने तनिष्का सुरू केलेल्या 'सकाळ'ला भन्यवाद दिले. समन्वयक मोहन काळे यांनी तनिष्का व्यासपीठाबाबतची माहिती दिली. अजय आदाटे यांनी आभार मानले.

              आपल्या परिसरातील आणि वैयक्तिक  इतर सर्व अडी-अडचणी सोडविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग सर्व नागरिकांनी करावा असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे सर यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.

             ॲग्रीकॉस एक्सपोर्टचे संचालक अजय आदाटे यांनी स्वागत केले. संदीप पवार यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.

            अधिक माहितीसाठी संपर्क खालील नंबर वर संपर्क साधावा. मो. 9561221140test banner