मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी कडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ७ जानेवारी, २०२४

मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी कडून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सोहळा.                 मंगळवेढा:मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालय येथे काल (दि.६) या पत्रकार दिनानिमित्त विविध वृत्तपत्रांच्या तालुका प्रतिनिधींच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटी मंगळवेढा यांच्या वतीने व सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया उत्साहात पार पडला.


                  मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत साळे हे होते. त्यांच्या हस्ते येथील पत्रकार तालुका प्रतिनिधी यांचा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 3.30 वाजता सत्कार करण्यात आला. समाज प्रबोधनात महत्वाची भूमिका बजावणारे, समाज व्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ असणारे, आपल्या निर्भिड आणि पारदर्शक लेखणीच्या सामर्थ्यावर सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य विषयक, शैक्षणिक, प्रशासकीय आदी क्षेत्रातील कामांना प्रोत्साहन आणि कमतरतेवर बोट ठेवत समाजात एक चांगला पायंडा घालून देणारे म्हणजेच समाज व्यवस्था घडविण्यासाठी योगदान देण्याचे कार्य हे पत्रकाराच्या लेखणीतुन होत असते असे आपले मनोगत व्यक्त करतांना प्रशांत साळे यांनी व्यक्त केले.


                 याप्रसंगी पत्रकारांचा बाबासाहेबांची पत्रकारिता आणि समजासुधरकांचे विचार असे वैचारिक पुस्तक, दैनंदिनी पेन व काँग्रेस कमिटी कडून सन्मान प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


               मोहन माळी (दामाजी एक्सप्रेस) , दत्तात्रय कांबळे दैनिक (पुढारी) , दादासाहेब लवटे (दैनिक स्वराज्य), केशव जाधव (संचार), प्रवीण गांडुळे (लोकमत), राजेंद्र कुमार जाधव (दामाजी न्यूज), सुनील कसबे (महाराष्ट्र भूषण न्यूज), बाबासाहेब सासणे (पुण्यनगरी), अक्षय पवार (स्वाभिमानी छावा) , प्रसाद कसबे (पंत नगरी), रोहिदास भोरकडे (ए आर न्यूज.) सिद्धेश्वर डोके (दिव्य मराठी) ,समाधान फुगारे (मंगळवेढा टाइम्स), प्रमोद बिनवडे (रणयुग टाइम्स), विजय भगरे (संचार), दिगंबर भगरे (दामाजी न्यूज), म्हाळाप्पा शिंदे (मंगळवेढा दणका), संतोष मिसाळ (दामाजी न्यूज), सचिन हेंबाडे (बी आर न्यूज) ,श्रीकांत मेलगे (सकाळ), शंकर सपताळे (तरुण भारत) , पत्रकार संघाचे अध्यक्ष भिमराव मोरे , सुमित कसबे (दामाजी एक्सप्रेस), हुकूम मुलानी (दैनिक सकाळ),मोहन काळे (दैनिक सकाळ तनिष्का समन्वयक), प्रशांत मोरे (दिव्य मराठी) यांचा सत्कार करण्यात आला. 

              यावेळी मंगळवेढा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पवार, शिवशंकर कवचाळे, बापू वाकडे ,दिलीप जाधव, पांडुरंग जावळे,अमोल मम्हाने , तालुका काँग्रेसचे महिला अध्यक्ष जयश्रीताई कवचाळे सुनीता अवघडे, बापू अवघडे ,शहाजी कांबळे, फारुख मुजावर राजन ठेंगील आणि सर्व काँग्रेस सहकार्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अजय आदाटे यांनी केले तर दिलीप जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.test banner