कौतुकास्पद!मंगळवेढा येथील धनश्री परिवारातील या सदस्याला मिळाली मोठ्या व्यासपीठावर गाण्याची संधी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २१ जानेवारी, २०२४

कौतुकास्पद!मंगळवेढा येथील धनश्री परिवारातील या सदस्याला मिळाली मोठ्या व्यासपीठावर गाण्याची संधी.

     


                    मंगळवेढा:धनश्री पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त व प्रा.शिवाजी काळूंगे यांच्या अमृत महोत्सवा निमित्त धनश्री व सीताराम परिवार आयोजित कार्यक्रम उषा मंगेशकर संगीत रजनी.

                    या वेळी उषा मंगेशकर बोलताना म्हणाल्या अचानक तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचा आवाज चडत नव्हता तरीही त्यांनी चाडत्या आवाजात गाणी गायली.पुढे बोलताना त्या म्हणाल्या की भविष्यात मंगळवेढ्यात पुन्हा एकदा येऊन सेवा करीन असे त्या म्हणाल्या.

                  उषा मंगेशकर यांनी "माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी!"हे अप्रतिम गीत गायले या गाण्याला प्रेषक वर्गातून अक्षरशः टाळ्यांचा पाऊस सुरू झाला.त्यांनतर "मुंगळा मुंगळा" गाणे गाऊन "ए मेरे वतन के लोगो" या गाण्याने गाण्याचा समारोप केला. तर त्यांनी गायलेली अशी अनेक गाणी म्हणून सर्वांना भारावून टाकले.


                 त्यांनतर कविता पौडवाल यांनी "रुपेरी वाळूच्या बनात येणा" हे गाणे सादर केले.या गाण्याला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली.

               त्यावेळी धनश्री परिवाराचे सदस्य मंगळवेढा गावातील एक उमदा गायक नितीन इंगळे त्या मोठ्या व्यासपीठावरती धनश्री परिवाराच्या अग्रस्थ गाणे गाण्याची संधी मिळाली व नितीन इंगळे यांनी "अगर तुम ना होते तो हमे और जिने की चहात ना होती" हे गाणे सादर त्या मोठ्ठ्या स्टेज वरती सादर करून वाहवा मिळवली व त्या मिळालेल्या संधीचे सोने केले. गाण्याला भरभरून दाद मिळाली व इंगळे यांचे सर्वच स्तरातून,गावातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.test banner