महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे म.न.पा व न.पा राज्य सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय चेळेकर यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा 18 जानेवारी रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे उत्साहात संपन्न झाला .
यावेळी अध्यक्षस्थाना वरून बोलताना शिक्षक नेते मा. संभाजीराव थोरात यांनी संजय चेळेकर यांचे शैक्षणिक,संघटनात्मक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले.शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाकडे व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.अनेक वेळा प्रशासना बरोबर संघर्ष करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची भुमिका घेतली.शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक संघ नेहमीच कटिबद्ध राहिल अशी ग्वाही यावेळी त्यांनी बोलताना दिली.
माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी संजय चेळेकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेला जनसमुदाय हा केवळ चेळेकर सरांच्या केलेल्या कार्यामुळेच ! एक माजी मंत्री यांना ऐकण्यासाठी एवढे लोक येत नसतात परंतु चेळेकर सरांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त जमलेला जनसमुदाय पाहून आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.स्मिता पाटील यांनी संजय चेळेकर यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मी या कार्यक्रमाला एक अधिकारी म्हणून नव्हे तर कुटुंबातीलच एक सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगितले.
यावेळी सत्कार मुर्ती संजय चेळेकर यांनी बोलताना आजपर्यंतच्या कारकिर्दीचा आढावा सांगून या प्रवासात अनेकांनी सहकार्य केल्याचे सांगितले. या यशामध्ये शिक्षक,पालक, विद्यार्थी, मित्रपरिवार व कुटूंब यांची मोलाची साथ मिळाल्याचे सांगितले.यावेळी तेजस्विनी कदम व मच्छिंद्रनाथ मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आ.समाधान आवताडे , बबनराव आवताडे,अभिजीत पाटील , प्रा.शिवाजीराव काळुंगे , शिवानंद पाटील , भगिरथ भालके , अनिल सावंत , नंदकुमार पवार , येताळा भगत सर ,पोलीस निरीक्षक रणजीत माने, विनायक साळुंखे , पोपट लवटे हे मान्यवर उपस्थित होते.वाढदिवसाच्या कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी राज्य , जिल्हा व तालुका संघटनेचे पदाधिकारी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संभाजी तानगावडे व आभार कार्यकारी अध्यक्ष कविराज दत्तू यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत मुढे यांनी केले