प्रभु श्रीराम प्रतिष्ठापनादिनी मंगळवेढ्यात शोभायात्रा निघणार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २१ जानेवारी, २०२४

प्रभु श्रीराम प्रतिष्ठापनादिनी मंगळवेढ्यात शोभायात्रा निघणार.

           


                        मंगळवेढा:रामजन्मभूमी आयोध्या नगरीत दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावात करण्यात येणार आहे.

                       त्याच दिवशी संतनगरीत देखील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे प्रतिष्ठापनादिनी शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रा काढली जाणार असून मारूती पटांगणात समारोप करण्यात येणार आहे.


                       यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे शोभायात्रेवेळी रामभक्तांकडून पुष्पवृष्टी केली जाणार आहे संपूर्ण देशात होणाऱ्या आनंददायी जल्लोषात मंगळवेढा नगरीदेखील न्हाऊन निघणार आहे तरी भक्तीमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जास्तीत रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रभू श्रीराम शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.test banner