न.पा.शाळा क्र ५ च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी परमेश्वर पाटील. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

न.पा.शाळा क्र ५ च्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी परमेश्वर पाटील.

     


                मंगळवेढा: नगरपरिषद शिक्षण मंडळ मंगळवेढा संचलित न.पा.शाळा क्रं. ५ च्या शाळा व्यवस्थापन समिती निवड संबंधी आयोजित पालक सभा आयोजित करण्यात आली होती.

               त्यामध्ये अध्यक्षपदी शाळेचे पालक परमेश्वर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ.सुनीता सुतार यांची सर्वानुमते करण्यात आली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी महिला पालक सौ.राजश्री दत्तू,स्वप्नाली सावंजी,ज्योती  सलगर,श्री.विशाल माने,शामराव आठवले,सौ.दिपाली भंडारे,वर्षा पुजारी,गणेश सालुटगी यांची निवड करण्यात आली. 

              अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना परमेश्वर पाटील म्हणाले की शाळेच्या नवीन इमारतीसाठी आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून  जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येणार असून अनेक सोयी सुविधा शाळेसाठी उपलब्ध होणार आहेत व शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पालक व शिक्षक यांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. 

              यावेळी मुख्याध्यापक विशाल गायकवाड,भाग्यश्री काळूंगे,शुभांगी पलंगे,प्रा.विनायक कलुबरमे,अरुण गुंगे,सतीश दत्तू उपस्थित होते यांचेसह मोठ्या संख्येने पालक उपस्थीत होते.test banner