शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी दत्तात्रय भोसले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी दत्तात्रय भोसले.

       


       

                   मंगळवेढा:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मंगळवेढा शहराध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख गणेश वानकर,जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,पंढरपूर विधानसभा संपर्कप्रमुख भटकळ,उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने यांच्या शिफारशी अन्वये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंगळवेढा शहराध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

                    शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून विविध नियुक्ती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यात दत्तात्रय भोसले यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

                    त्याच बरोबर मंगळवेढा तालुका प्रमुखपदी प्रा.येताळा भगत,विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदी तुकाराम कुदळे,विधानसभा मतदारसंघ संघटक पदी भारत गवळी मंगळवेढा शहर संघटकपदी गणेश कुराडे आदींच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.test banner