मंगळवेढा:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक मंगळवेढा शहर अध्यक्ष पदी जमीर इनामदार यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
पत्र दिल्यानंतर जमीर इनामदार यांचा सर्वांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी चे नेते अभिजीत पाटील,तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील,मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी,युवक तालुका अध्यक्ष अजिंक्य बेदरे,मुज्जमील काझी,सुहास मूरडे आदी.मान्यवर उपस्थित होते.
आदरणीय पवार साहेब यांचे विचार आणि कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढी साठी व बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष जमीर इनामदार यांनी यावेळी सांगितले.