आयोध्येत श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मंगळवेढ्यात अवतरले राम,सिता,लक्ष्मण,हनुमान. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २१ जानेवारी, २०२४

आयोध्येत श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मंगळवेढ्यात अवतरले राम,सिता,लक्ष्मण,हनुमान.



                 मंगळवेढा:शरयू नदीच्या काठावर वसलेल्या आयोध्या नगरीत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उदईक सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्री रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

                 अशा पूर्वसंध्येला मंगळवेढ्यात मात्र प्रभू श्रीराम,सिता,लक्ष्मण, हनुमानाच्या वेशभूषेतील बालकलाकार अवतरले आहेत प्राणप्रतिष्ठापना दिवशी अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे व भक्तिमय वातावरण असणार आहे.


                 त्यानिमित्ताने मंगळवेढ्यातील सिद्धार्थ अर्जुन नागणे याने श्रीरामाची,शिवन्या विनायक कलुबर्मे हिने सितेची,शिवतेज विनायक कलुबर्मे याने लक्ष्मणाची तर सार्थक आनंद खटावकर याने हनुमानाची भूमिका अप्रतिम साकारली आहे.

                 खरोखरच वनवासातून परत येताना व आयोध्या नगरीत स्वागत करतानाचे प्रसंग सदर वेशभूषेतून व अभिनयातून अतिशय उत्तम पद्धतीने साकारले आहेत मंगळवेढ्यात या बाल कलाकारांनी भक्तीमय वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

                सदरचे प्रसंग आपल्या फोटोग्राफीतून टिपताना लेन्स स्वॅप क्रियेशनचे मालक स्वप्निल नागणे यांनी परिश्रम घेतले.



test banner