श्री संत दामाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'माय मराठी बोलू कौतुके' कार्यक्रम संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० जानेवारी, २०२४

श्री संत दामाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 'माय मराठी बोलू कौतुके' कार्यक्रम संपन्न.

         


                    मंगळवेढा:श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त माय मराठी बोलू कौतुके कार्यक्रमातून मराठी भाषेची महती रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव येथील  सुप्रसिद्ध कवी प्रा डॉ अरविंद हंगरगेकर यांच्या काव्यातून सादर करण्यात आली.

                     यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन बी पवार उपस्थित होते यावेळी कवितांचे सादरीकरण करत असताना हंगरगेकर यांनी त्यांच्या तवा, पावसा,गणपत प्रेमात पडला,पुस्तक म्हणाले अशा बहारदार कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करता करता प्रबोधनही केले त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्त्व,लोप पावत चाललेली वाचन संस्कृती याबद्दल विचार व्यक्त केले.


                     अध्यक्षीय भाषणात डॉ पवार म्हणाले की,मनातील भावभावना व्यक्त करण्याचे भाषा एक महत्त्वाचे साधन आहे. आपली मातृभाषा मराठी असून तिला अनेक वर्षांची परंपरा आहे. तिचे संवर्धन करणे काळाची गरज आहे आणि ते आपले कर्तव्यही आहे मराठीमध्ये अनेक थोर कवी, साहित्यिक होऊन गेलेले आहेत

                      तसेच मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात लेखनही होत आहे.मानवतेच्या कल्याणाचा विचार करणारे संत ज्ञानेश्वरांनी मराठीची महती सांगितली आहे.स्पर्धा परीक्षेमध्येही मराठी भाषेतून पेपर लिहिता येतात आज मराठी भाषेकडे एक उपजीविकेचे साधन म्हणूनही पाहता येईल वृत्तपत्र लेखन, मुलाखत,अनुवाद अशी अनेक क्षेत्रे तिच्यासाठी खुली आहेत.

                       याप्रसंगी मधुकर हुजरे तसेच प्रा डॉ राजकुमार पवार यांनीही कवितांचे सादरीकरण केले.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ औदुंबर जाधव यांनी केले सूत्रसंचालन प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर आभार प्रा विनायक कलुबर्मे यांनी मानले.



test banner